{khapre.in}
Nothing More : Nothing Less : Just Perfect : Online Since 1997
7
Saturday, March 06, 2010

कॄपालू महाराजांची कृपा

भारतातील उत्तरप्रदेशमध्ये श्रीकृपालुमहाराजांच्या आश्रमात चेंगराचेंगरी होऊन ६६ लोक जागेवरच ठार झाले, तर शेकडो जखमी झाले. भारतात मरण स्वस्तझाले आहे. दर रोज कोणी ना कोणी तरी, अगदी डझनावरी माणासे मरतात. घातपात, अपघात, खून यातून हे होते, अगदीच नाहीतरी दहशरवादी तयारच आहेत. आतातर काय हे रोजचेच झाले आहे. बाबांना किती प्रसिद्धीचा सोस त्यांनी गरीबांसाठी अल्प भेट ठेवली होती, प्णा भारतात दारिद्र्य एवढे आहे की, लोक जीवाची पर्वा न करता गर्दी करतात. महाराजांच्या पत्नीचे वर्षश्राद्ध होते आणि त्यानिमित्त भोजन, स्टीलचे ताट, आणि दहा रूपये मिळाणार होते त्यासाठी एवढी गर्दी. कॄपालूमहाराजांनी गर्दीचे प्रदर्शन करण्यासाठी हा स्टंट केला होता.पण त्यात माणसे मेली त्याबद्धल महाराज काय देणार. त्यांनी भक्तांचे प्राण का वाचवले नाहीत? त्यांना हे आधीच का कळले नाही.

सरकार महागाई रोखू शकत नाही, अशात जगणे म्हणजे रोजच मरण आहे. पण कुणला काय त्याचे, ज्यआंना आम्हीनिवडून दिले तेल ागलेत पैसे कमवायला. त्यांना जातीचे, धर्माचे राजकारण कराय्ला भरपूर वेळ आहे, पणा लोकांच्या समस्या सोडवायला वेळा कुठे आहे. आता भारतात एक नवीनच प्रकार आहे, जिवंत माणसांना किंमत नाही, पाण मेल्यावर मात्र अनुदान घोषित होतात. म्हणजेच काही सरकारकडून मिळवायचे असेल तर मात्र, पण योग्य जागा योग्य वेळ निवडा.


दिलीप खापरे@2:13 AM < 4 (0) @ Add

. . ° º o O o º ° . .


7
Monday, March 01, 2010

किडनी

काही महत्वाचे काम निघाले म्हणून स्वतःची कार घेतली आणि चाललो होतो गावाला. खुप छान प्रवास चालला होता. रात्रीची वेळ होती. अमावास्येची रात्र असल्याने सर्वत्र काळोख पसरला होता. चंद्रच नाही तर उजेड कुठला. त्यातच उन्हाळ्याचे दिवस असल्याने रात्रीचा हवेत गारवा जाणवत होता म्हणून कारच्या काचा उघड्या ठेवूनच प्रवास चालला होता. टेपवर मधुर गाणी वाजत होती. निर्जन रस्ता. फक्त कारच्या उजेडात जी काही झाडी किंवा रस्ता दिसेल तेवढाच. साधारण १० वाजले असतील काय झाले माहित नाही पण कार आचके देऊन बंद पडली. गाडी थांबली. उतरुन बाँनेट उघडून पाहिले तर काही कळत नव्हते. फक्त एवढेच लक्षात आले कि इंजिन खूप गरम झाले आहे. कधीही दुरुस्तीचा संबंध न आल्याने हतबल होतो. आता काय करावे?  रात्रीची वेळ, आजूबाजूला चिटपाखरु नाही. रहदारी नाही. भयाण शांतता. तेवढ्यात कोठून कोण जाणे एक गृहस्थ येतात त्यांनी अंगात पांढरा लांबकोट, जसा डॉक्टर घालतात, घातलेला आहे. आणि विचारतात काय झाले? मी म्हणालो गाडी बंद पडलीय कोणी मेकॅनीक मिळेल का? तर डॉक्टर म्हणतात आता उद्या सकाळीच मेकॅनिक मिळेल, शिवाय गाव दोन किलोमीटर दूर आहे. तिथे गॅरेज आहे तेव्हा आता इथे एकटे थांबून काय करणार? इथेच पलीकडे आमचे घर आहे तेव्हा गाडी राहू देत इथे. माझ्याबरोबर चला. रात्री तिथेच रहा, मग सकाळी पुढच्या गावातून मेकॅनिक आणा आणि मग गाडी दुरूस्त करून जा. मी विचार केला नाहीतरी आता इथे रात्रभर थांबून काय करणार? त्यापेक्षा या डॉक्टरांसोबत त्यांच्या घरी रात्र तरी काढावी. म्हणून मी त्यांच्याबरोबर जाऊ लागलो.
थोड्याच वेळात आम्ही एका छोट्याशा घराजवळ आलो घर छान टुमदार होते. पण आजूबाजूला दूरवर घर नव्हती म्हणून ते घर एकाकी वाटत होते. आत लाईट लागलेल्या होत्या. आणि आतमध्ये अजून कोणीतरी होते, मी विचार केला बरे झाले चांगली सोबत झाली. आता रात्र सुखात जाईल. गप्पागोष्टी होतील म्हणून आम्ही घरात आलो. तिथे सुध्दा दोन डॉक्टर होते आणि एक नर्स पण होती. जणू तो छोटासा दवाखानाच होता. मला कळेचना एवढ्या रात्री ही मंडळी जागी का ? जाऊ द्या आपल्याला काय करायचे आहे ?.
थोड्या वेळातच गप्पांना सुरुवात झाली तेव्हा कळले कि ते तिघे डॉक्टर तो दवाखाना चालवितात आणि ती नर्स त्यांना मदत करते. शक्य तो दवाखाना दिवसरात्र चालतो. रात्री तर जास्तच कारण आजूबाजूचे पेशंट रात्री अपरात्री सुध्दा येतात. अगदी विशेष म्हणजे तिथे आँपरेशनसुद्धा केले जाते.
त्यांनी विचारले तुम्ही कांही खाणार जेवणार का ? मी अगदी नको म्हणत असताना सुध्दां त्यांनी बळेबळेच मला काही खायला दिले. मलाही जरा बरे वाटले. नाहीतरी सकाळपर्यंत कांही मिळणार नव्हतेच. खाल्ल्यावर जरा बरे वाटले. मग गप्पा सुरु झाल्या ती नर्स सुध्दा हसतखेळत आमच्या गप्पांमध्यें भाग घेऊ लागली.
अचानक काय झाले कुणास ठाऊक माझ्या पोटात दुखू लागले. थोडावेळ सहन केले पण दुखणे कांही थांबेना. नाहीतरी आपण दवाखान्यातच होतो तेव्हां त्या डॉक्टरांना शंका आली आणि त्यांनी विचारले कांही त्रास वाटतो का ? मी म्हटले हो जरा पोटात दुखते आहे. एकदम त्या डॉक्टरांची धावपळ सुरु झाली त्यांनी मला झोपायला सांगितले आणि काहीसे औषध दिले. एक इंजेक्शन ही दिले. ते आता आपापसात काही कुजुबुजू लागले. मला काहीच अंदाज येत नव्हता. डोळ्यावर थोडीशी ग्लानी आली होती. तेवढ्यात डॉक्टरांनी काहीतरी ठरवले आणि ते माझ्याकडे आले. आता त्यांचे म्हणणे पडले कि मला बहुतेक किडनीचा त्रास असावा. तेव्हा लगेच आँपरेशन करावे लागेल. आँपरेशनची सर्व सोय आहे. कारण सकाळपर्यंत खूप उशीर होईल मी म्हटले पण खर्च वगैरे ? डॉक्टर म्हणाले त्याची काळजी तुम्ही करु नका. बाकी सकाळी बघू.
आता त्यांनी मला एक इंजेक्शन दिले आणि मला गुंगी आली बहुतेक त्यांनी त्यांचे काम चालू केले वाटते. नंतर काय झाले माहित नाही.
सकाळी मला जाग आली तेव्हा काहितरी हलके हलके वाटत होते. पोटात खड्डा पडल्यासारखे वाटत होते. बहुतेक पोट दुखणे बरे झाले म्हणून असेल ?
पण आश्चर्य म्हणजे आजूबाजूला कोणीच नव्हते. ते डॉक्टर आणि ती नर्स कोणीही नव्हते. मी विचार केला. अरे कोठे गेले असतील म्हणून उठू लागलो तर मला उठताही येईना. तसाच पडून राहिलो. कारचा विचार करु लागलो, पुढच्या गावात जाऊन मेकॅनीक आणावा आणि कार दुरुस्त करुन पुढे जावे. पण मला उठताच येईना. डॉक्टरांना बोलवावे तर त्यांचा पत्ताच नव्हता. जणू ते गायबच झाले होते.
आता चांगले उजाडले होते. आणि एक खेडूत त्या ठिकाणी आला. मला पाहून त्याला आश्चर्य वाटले तो म्हणाला आपण कोण साहेब? आणि आपण इथे कसे? इथे तर कोणीच रहात नाही. मीच केव्हातरी साफसफाईला येतो. कारण मालक बाहेरगावी असतात आणि ते कधीच इथे येत नाहीत.
मी त्याला रात्रीची सर्व हकीकत सांगितली. आणि पोटात दुखण्याचे सांगितले शिवाय इथे तीन डॉक्टर आणि नर्स होती तेही सांगितले. तेव्हा त्याने कपाळावर हात मारुन घेतला आणि म्हणाला.
साहेब इथेच या रस्त्यावर वर्षापूर्वी एका कारला अपघात झाला होता. त्यात तीन डॉक्टर आणि एक नर्स होती. त्यांच्यावर किडनी विकण्यासंदर्भात आरोप होते म्हणून ते पळून चालले होते आणि त्यातच त्यांच्या कारला अपघात होऊन ते तिघेही त्यात मृत्यु पावले होते. तेव्हा पासून कधीकधी रात्री ते दिसतात.
मी अतिशय घाबरलो आणि मग माझ्या लक्षात आले कि, माझ्या डाव्या पोटाजवळ टाके घातलेले आहेत आणि म्हणून मला उठता येत नाही. बहुतेक माझी किडनी रात्री काढून घेण्यात आली होती.


दिलीप खापरे@8:58 PM < 4 (0) @ Add

. . ° º o O o º ° . .


7
Saturday, February 27, 2010

सकारात्मक विचार

आपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत असतात. चांगल्या आणि वाईट, सुखी आणि दु:खी, सकारात्मक आणि नकारात्मक, सुगंधी आणि दुर्गंधी, योग्य आणि अयोग्य पण यातून आपण कुठल्या आकर्षित करायच्या ते आपल्याच हातात आहे. यात महत्त्वाचे भूमिका बजावते ते आपले मन. मनच सर्वांचा कर्ता करविता आहे. हे मनच आत्म्याचे एक रुप आहे. आत्मा दिसत नाही, मन दिसत नाही पण त्याला अखिल ब्रह्मांडाची जाणीव आहे. ते क्षणार्धात करोडो मैलांचा पल्ला पार करु शकते. अक्षरश: ईश्वराला समोर उभे करु शकते. म्हणजेच मनाद्वारे आपण शरीरावर नियंत्रण, सभोवतालच्या परिस्थितीवर नियंत्रण आणू शकतो. बघा मन प्रसन्न असेल तर आजूबाजूचा परिसर, सजीव, निर्जीव सर्व गोष्टी प्रसन्न वाटू लागतात. अक्षरश: बाभळीला गुलाब दिसू लागतात. सुगंधी वातावरण  जाणवते. आता ह्या सृष्टीतल्या सकारात्मक, उर्जा जर आपण मनाद्वारे ग्रहण केल्या तर जीवन सकारात्मक ( positive) च असेल. मग म्हणा,“ माझा शुध्द आत्मा सृष्टीतलील सर्व शुध्द आणि पवित्र उर्जा ग्रहण करण्यास समर्थ आहे आणि त्या मी ग्रहण करीत आहे.”
असे दिवसातून ५ ते १० वेळा आकाशाकडे तोंड करुन, मोठ्याने, हात वर करुन म्हणा बघा काही दिवसातच काय फरक जाणवू लागतो.
सकरात्मक विचारात प्रचंड शक्ती दडलेली आहे. अगदी इंजिनमधल्या वाफेच्या दाबाइतकी, अणुबाँबमधल्या शक्ती इतकी. सकारात्मक विचाराने मानसिक त्रास होत नाही. विचारच करायचा ना?. तर मग सकारात्मक करुयात ना?
एखाद्याचे ह्रदयाचे ऑपरेशन आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यासाठी नेले जात आहे. जर त्याने विचार केला कि, माझे ऑपरेशन ठीक पार पडून मी लवकरच बरा होइन. तर मग इथेच विचार थांबतात. पण त्याने नकारात्मक विचार केला तर काय होईल? मग मला भूल नीट दिली जाईल काय? डॉक्टर निष्णात असतील का? ऑपरेशन जर यशस्वी झाले नाही तर? काय होईल? मग माझ्या बायका मुलांचे काय होईल? वगैरे वगैरे. या विचारांना अंतच नाही. शिवाय सर्व लोकांवर संशय येऊ लागतो. मला नीट बघतील का? डाँक्टर नीट आँपरेशन करतील ना? वगैरे वगैरे. आता बघा, असा विचार करुन काही उपयोग आहे का? आपण डॉक्टर मंडळी बदलू शकतो का? ऑपरेशन टाळणे आपल्या हातात आहे का? मग नकारात्मक विचार करुन आपले मानसिक खच्चीकरण कशासाठी?
दुसरे उदाहरण सांगतो. मला कोणाचे मोबाइलवर मिसकॉल आले तर मी खूपच चिडायचो. खूपच चिडचिड व्हायची हे लोक कशासाठी फोन घेतात वगैरे. मग मी काय करु लागलो. कुणाचा मिसकॉल आला ना?, त्याला परत उलट मिसकॉल देऊ लागलो. विचार करु लागलो अरे कदाचित त्याला मिसकॉल देऊन हे पहायचे असेल की आपल्याला वेळ आहे की नाही? मग मी उलट मिसकॉल देऊन गप्प राहू लागलो तर मग माझी चिडचिड कमी झाली. कारण मी त्याला सांगू लागलो, कि बाबारे मला वेळ आहे तू फोन कर. त्या दिवसापासून मी शांत राहू लागलो.
जी गोष्ट आपण टाळू शकत नाही, बदलू शकत नाही, पण त्यावर विचार करु शकतो तर मग सकारात्मक विचार का नको?
खाली काही प्रश्न मी देतो बघा त्यांची नकारात्मक उत्तरे तयार करुन. खूप त्रास होईल.
१) परिक्षेत जाणार्‍या विद्यार्थ्यांना विचारा- बाबारे नीट अभ्यास केलास ना?. नाहीतर नापास झालास तर काय करणार?.
२) रुग्णाला विचारा- औषधे वेळेवर घेत जा बरे का? औषधे नाही घेतली तर आजार बळावतो आणि मग त्यातच त्याचा अंत होतो.
३) प्रवासाला निघालेल्या माणसाला विचारा- अरे लवकर जा, नाहीतर गाडी चुकली तर काय करशील?.
४) कोर्टात निकालाच्या वेळेआधी विचारा- आपल्या बाजूने निकाल लागला तर उत्तम नाहीतर विरुध्द गेला तर काय करायचे?.
म्हणून म्हणतो , नेहमी सकारात्मक चिंतन करा. बघा निर्णय चांगलेच मिळतात.
१) कामाला बाहेर जाताना- मी ह्या कामाला जात आहे ते काम होणारच तो माणूस मला भेटणारच. आणि माझे काम होणार?.
२) परिक्षेला जाताना- मी अभ्यास चांगला केला आहे, मग मला पेपर सोपा जाणारच, मला चांगले मार्क मिळणार.
३) कोणाकडची उधारी वसूल करताना- मी पैसे देताना शुध्द मनाने दिलेत तरी तो मला पैसे परत देईन.
४) डाँक्टरकडे जाताना- मला बरे वाटत नाही पण मी मनाची खात्री करतो की मला बरे वाटेल आणि मी ठणठणीत बरा होईन. प्रत्येक वेळेस असे सकारात्मक विचार करा आणि परिणाम पहा.
शेवटी अजून एक मंत्र देतो.
“ रात्री झोपताना, दोन्ही हात जोडून म्हणा-
“ माझ्या शुध्द आत्म्याने, मी जगातील सर्व आत्म्यांची माफी मागत आहे. माझे हातून दिवसभरात काही अपराध झाल्यास, कोणी आत्मा दुखावला गेल्यास, त्यांनी माझ्या आत्म्याला क्षमा करावी ”.


दिलीप खापरे@9:26 PM < 4 (0) @ Add

. . ° º o O o º ° . .


7
Wednesday, February 24, 2010

पुन्हा देव

जगात देव आहे की नाही? आतापर्यंत या विषयावर अनेकांनी आयुष्य खर्ची पाडलीत मग आता आपण नव्याने त्या विषयात बोलण्यात काहीच अर्थ नाही. मग हा विषय आता का? तर आमचे असे मत, नाही खात्री आहे की, आता जगात जो हिंसाचार चालला आहे, त्यामागे देवाबद्दल श्रद्धाच असावी. बघा, प्राचीन इतिहास बघा, माणसात जाती संस्था, धर्म होता काय? नाही मग असे काय घडले की, धर्म निर्माण झाले. धर्म प्रथम कोणी निर्माण केला, ही संकल्पना कोणाच्या डोक्यात आली, आणि त्याला धर्माची काय जरूरी भासू लागली. हिंदू कसे निर्माण झाले, यांनी हे आपले देव आहेत हे कशाच्या आधारावर मानले? नंतर ख्रिश्चन धर्माचा उदय झाला, तेव्हा त्यांच्या धर्मसंस्थापकाला अशी काय जरूरी भासली की, नवा धर्म स्थापन करावा त्यांच्यासाठी वेगळी नियमावली म्हणजेच धर्मग्रंथ प्रमाण ठेवावा. मुस्लिमांनी तरी विशीष्ट धर्म का पाळावा. काय झाले यामुळे लोक धर्मांध होऊ लागले, धर्म प्रसार करून आपल्या देवांच्या संकल्पना दुसर्‍याच्या माथी मारू लागले. जर जगात प्रथम धर्माची गरज निर्माण नसती झाली तर आज ही परिस्थिती आली असती का?

देव कोणी पाहिलाय का? नाही, मग हे पुतळे, मुर्त्या, चित्रे काय आहेत तर ते असतील, फक्त कल्पनाशक्तीव्या भरार्‍या. नाहीतर एकेका देवा्चे अनेक प्रकारचे फोटो का मिळाले असते. वेगवेगळ्या मुर्त्या का पूजील्या असत्या.प्रत्येकजण आपापल्या विचाराप्रमाणे देव शोधत असतो. इतर देवांबरोबर आपल्या देवाची तुलना करत असतो. मग श्रेष्ठत्वा बद्दल वाद निर्माण होतात. आदिमानवाला देव माहीत नव्हता पण तो या पंचमहाभूतांमध्येच देव शोधत होता. पंचमहाभूते कोणातही कसलाही फरक नाहीत. कोणत्याही देशातला माणूस असो हवा त्याला प्राणवायू देणारच, तो जे पेरेल तेच उगवणार. साखर सर्वांना गोडच लागणार, भले नाव वेगळे असू देत. म्हणून पंचमहाभूतेच सत्य आहेत.

आज जगातील सर्व लोकांची  भाषा एकच असती तर. कोणीही मोठेपणा साठी नवा धर्म, नवा पंथ न स्थापता याच धर्मातून कार्य केले असते तर? तत्वज्ञान सांगण्यासाठी वेगळ्या भाषेच्या कुबड्या कशासाठी? वेगवेगळे धर्म, जाती, पंथ, धर्मग्रंथच आज या सर्व दहशतवादाला कारणीभूत आहेत. सर्व एकाच धर्माचे असते तर धर्मांधता असती काय? धर्मात अतंर्गत कलह झाला असता काय? कधी कधी वाटते हे धर्मसंस्थापकच निर्माण झाले नसते तर?


दिलीप खापरे@11:18 AM < 4 (0) @ Add

. . ° º o O o º ° . .


7
Monday, February 22, 2010

बॉम्बस्फोट

पुण्यात १३ फेब्रुवारीला जर्मन बेकरीत स्फोट झाला. आख्खे पुणे शहर हादरले. मुंबईच्या आठवणी जाग्या झाल्या पण त्याच बरोबर न्यायालयात जो खेळखंडोबा चाललाय, ते पाहून या पुण्यातील तपासातून काय निष्पन्न होणार आहे आणि पोलीसांनी अथक प्रयत्न केल्यावर ते आरोपी न्यायालयात काय गोंधळ घालणार आहेत हे आता स्पष्ट आहे. कितीतरी अतिरेकी फाशीची सजा होऊनही तुरूंगात मेजवानी झोडत आहेत. खटल्यावर खर्च, शिवाय त्यांच्या सुरक्षिततेवर खर्च, नंतर त्यांचा तुरूंगातील खर्च, म्हणजे कोणीकडून सगळा त्रासदायकच प्रकार.

आज पुण्यातील बॉम्ब स्फोटाला दहा दिवस झालेत पण अजूनही पोलीस चाचपडतच आहेत, त्यांना काहीही सुगावा लागत नाही, काय म्हणावे या प्रकाराला. कोणीही गंभीर नाहीच. जसा वेळ जातो, दिवस जातात तसा लोकांचा त्यातील सहभाग कमीकमी होत जातो. स्फोट झाला सगळे जागे झाले, भरपूर बंदोबस्त वाढवला, सगळीकडे डोळ्यात तेल घालून तपासणी, जणू काय आता अतिरेकी लगेचच हल्ला करणार. साधी गोष्ट आहे सगळे वातावरण थंड झाले, लोक शांततेत जीवन जगू लागले तेव्हाच अतिरेक्यांना जोर येणार ना? म्हणजेच सर्वांनी सतत जागरूक राहिले पाहिजे, सतर्क पाहिजे. आणि पोलीसांनी आपली सुरक्षितता पाहण्याऐवजी नागरिकांची सुरक्षिततापाहिली पाहिजे.


दिलीप खापरे@10:07 PM < 4 (0) @ Add

. . ° º o O o º ° . .