HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|देवांच्या भूपाळ्या|
देवांच्या भूपाळ्या भूपाळी घनश्याम श्रीधराची घनश्याम सुंदरा श्रीधरा अर
भूपाळी श्रीगणपतीची - उठा उठा हो सकळिक । वाचे स...


देवाला जागे करण्यासाठी पहाटे जी गाणी म्हणतात, त्यांना 'भूपाळी' म्हणतात.
Poems that can be sung early morning while remembering God Ganaesha.



47GOOG
भूपाळी श्रीगणपतीची
उठा उठा हो सकळिक । वाचे स्मरावा गजमुख ।
ऋध्दि-सिध्दिचा नायक । सुखदायक भक्तांसी ॥ ध्रु. ॥
अगीं शेंदुराची उटी । मथां शोभतसे कीरिटी ।
केशरकस्तुरी लल्लाटीं । हार कंठी साजिरा ॥ १ ॥
कानी कुंडलाची प्रभा । चंद्र-सूर्य जैसे नभा ।
माजीं नागबंद शोभा । स्मरतां उभा जवळी तो ॥ २ ॥
कांसे पितांबराची धटी । हाती मोदकांची वाटी ।
रामानंद स्मरता कंठी । तो संकटी पावतो ॥ ३ ॥
Translation - भाषांतर

N/A
47GOOG
References : N/A

Created by TransLiteral /Courtsey {Khapre.org} on 2008-02-22T22:59:25.1845952-05:00

Comments | अभिप्राय