HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|देवांच्या भूपाळ्या|
भूपाळी श्रीदत्तप्रभूची उठीं उठीं बा आत्मया । चिन भूपाळी श्रीदत्तप्रभूची पाहें पाहें सद्‌गुरुमूर्त
भूपाळी श्रीदत्तप्रभूची - उठी सत्त्वर प्रभुवरा यतिव...


देव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे.

Poems that can be sung early morning while remembering God.



13GOOG
भूपाळी श्रीदत्तप्रभूची

उठी सत्त्वर प्रभुवरा यतिवरा । स्नानासी उशीर जाहला ।

देवा स्नानासी उशीर जाहला । पाहें स्वामि दयाळा ।

त्रिभुवन पाळा । अरुणोदय जाहला ॥ध्रु०॥

कर जोडुनी सुरनर मुनिवर उभे महाद्वारीं । देवा उभे महाद्वारीं ।

द्यावें दर्शन श्रीहरि नरहरी । सद्‌गुरु अवधारीं ॥१॥

सद्‌गुरु मूर्ती अनंत कीर्ति श्रुति वर्णिती पाहीं ।

देवा श्रुति वर्णिती पाहीं ।

स्मरणीं तारक निज सुखदायक । भक्‍तां लवलाहीं ॥२॥

ऐकुनी वाणी चिन्मय खाणीं । उठतां विश्वात्मक तारुं ।

सद्‌गुरु विश्वातमक तारुं ।

सर्वही ध्यानीं वंदन करिती । गुरुवर कल्पतरु ॥३॥

काषायांवर भस्मभूषणें धारण रुद्राक्षाभरणें ।

विलसती रुद्राक्षाभरणें ।

दंडकमंडलु, गदा, पद्म, । शंख, चक्र, शोभती पूर्णें ॥४॥

किरीटकुंडलमंडित षड्‌भुजमूर्ती कीर्ति सांवळी ।

प्रभूची मूर्ती कांति सांवळी ।

नमितां श्रीगुरु भक्त दत्त सतत पदी । नांदवि तात्काळीं ॥५॥

Translation - भाषांतर

N/A
13GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-11T01:55:37.8027664-04:00

Comments | अभिप्राय