HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|दत्त आरती संग्रह|
दत्ताची आरती आरती दत्तात्रयप्रभूची । दत्ताची आरती दत्तात्रय अवधूत जनार्दन स
दत्ताची आरती - जय देवा दत्तराया । स्वामी...


देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.



14GOOG
दत्ताची आरती

जय देवा दत्तराया । स्वामी करुणालया ।

आरती ओंवाळीन । तूज महाराज या ॥ धृ. ॥

प्रपंचताट करी । त्रिविधताप निरंजनी ॥

त्रिगुण शुभ्रवाती । उजळि या ज्ञानज्योती ॥ जय. ॥ १ ॥

कल्पना मंत्रपुष्प । भेद दक्षिणा वरी ॥

अहंभाव पूगीफळ । न्यूनपूर्ण सकळ ॥ जय. ॥ २ ॥

श्रीपाद श्रीगुरूनाथा ॥ चरणीं ठेऊनी माथा ॥

विनवितो दास हरी ॥ अवघा त्रास दूर करी ॥ जय. ॥ ३ ॥

Translation - भाषांतर

N/A
14GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-16T03:28:32.5181664-04:00

Comments | अभिप्राय