HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|दत्त आरती संग्रह|
दत्ताची आरती दत्तात्रय अवधूत जनार्दन स दत्ताची आरती आरती दत्तराजगुरुची । भव
दत्ताची आरती - त्रिगुणात्मक त्रैमूर्ती ...


देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.



14GOOG
दत्ताची आरती

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा ।

त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।

नेती नेती शब्द न ये अनुमाना ॥

सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥

जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता ।

आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥

सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त ।

अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥

पराही परतली तेथे कैचा हेत ।

जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥

दत्त येऊनिया ऊभा ठाकला ।

भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥

प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।

जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥

दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।

हरपले मन झाले उन्मन ॥

मी तू पणाची झाली बोलवण ।

एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥

Translation - भाषांतर

N/A
14GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-16T03:31:20.5798272-04:00

Comments | अभिप्राय