HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|दत्त आरती संग्रह|
दत्ताची आरती देहत्रय अवतारा तापत्रय हर दत्ताची आरती पतिव्रता सती अनुसया माता
दत्ताची आरती - धन्य हे प्रदक्षीणा सदग...


देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.



9GOOG
दत्ताची आरती

धन्य हे प्रदक्षीणा सदगुरूरायाची ।

झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ॥ धृ ॥

गुरुभजनाचा महीमा नकळे अगमानिगमांसी।

अनुभविते जाणति जे गुरुपदिंचे अभिलाषी ॥ धन्य. ॥ १ ॥

पदो पदी झाल्या अपार पुण्याच्या राशी ।

सर्वही तिर्थे घडली आम्हां आदिकरूनि काशी ॥ धन्य.॥

मृदंगताघोषी भक्त भावार्थे गाती ॥

नामसंकीर्तने नित्यानंद नाचताती ॥ धन्य. ॥ ३ ॥

कोटीब्रह्महत्या हरती करितां दंडवत ।

लोटांगण घालितां ॥ मोक्ष लागे पायांता ॥ धन्य ॥ ४ ॥

प्रदक्षिणा करुनी देहभाव हरवीला ।

श्रीरंगात्मत विठ्ठल पुढे उभा राहिला । धन्य हे प्रदक्षिणा ॥ ५ ॥

Translation - भाषांतर

N/A
9GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-17T01:25:02.5704992-04:00

Comments | अभिप्राय