HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|दत्त आरती संग्रह|
दत्ताची आरती नृसिंहसरस्वती । मनि धरुनि दत्ताची आरती आतां स्वामी सुखे निद्रा क
दत्ताची आरती - आरती दत्तराजयांची । अनु...


देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.



27GOOG
दत्ताची आरती

आरती दत्तराजयांची ।

अनुसया अत्रि सुपुत्राची ॥ धृ. ॥

गाणगा भुवनी तूं वससी ।

भक्त संकटासि बा हरिसी ।

भजती त्यातें उद्धरिसी ।

अंती मोक्षपदा नेसी ॥ चाल ॥

सर्वोत्तमात्रिजगत्पाला लुब्ध होउनि अंजलि भरुनि ।

पुष्पें वाहिन । नाथ सख्या तुमची ।

गाईन लीलाकीर्तीची ॥ काषयांबर फटीं साजे ।

त्रिभुवनीअतुल कीर्ती गाजे, वर्णन करितां गुण तुझे ।

श्रमले मन हें बहु माझे ॥ चाल. ॥

विरंची विष्णू शिव मूर्ति । भवब्धि तरण मी तुला शरण जन्म आणि मरण चुकवुनि शुद्ध करी साची ।

कुमतिहर दत्तराजयाची ॥ २ ॥

Translation - भाषांतर

N/A
27GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-17T01:31:16.0074752-04:00

Comments | अभिप्राय