HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|दत्त आरती संग्रह|
दत्ताची आरती जयजयजी श्रीदत्तराज ही पंच दत्ताची आरती आरती ओवाळूं श्रीगुरू त्रै
दत्ताची आरती - जय श्रीदत्ता आरती तुजला क...


देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.



14GOOG
दत्ताची आरती

जय श्रीदत्ता आरती तुजला करितों मी भावें ।

मंदमती हा पातक परि तव दर्शन मज द्यावें ॥ धृ. ॥

अनाथ आम्ही अधम पातकी नकळे हित आपुलें ।

क्षणिक सुखातें नित्य मानुनी मन विषयी रमलें ॥

धनमानादिक संचित करणें सार्थक हे गमलें ।

अति गहन या मोहविपिनीं चित्त सुचिर भ्रमले ॥

यांतुन दत्ता योगी जन ते तव नामें तरलें ।

विठ्ठलात्मज विनवितसें मज भवनदी उतरावें ॥ १ ॥

Translation - भाषांतर

N/A
14GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-17T01:37:11.3384160-04:00

Comments | अभिप्राय