HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|दत्त आरती संग्रह|
दत्ताची आरती ओवाळूं आरती श्रीगुरुराज स दत्ताची आरती येई बा नरहरीदत्ता गाणगापु
दत्ताची आरती - आरती ओवाळूं श्रीगुरु दत्त...


देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.



55GOOG
दत्ताची आरती

आरती ओवाळूं श्रीगुरु दत्तराज स्वामी ।

शरण आलो तुला देवा भक्तीने हा मी ॥ धृ. ॥

तारीं तारीं स्वामी आतं बुडतो भवडोहीं ।

अहंभाव जाळुनि माते कृपेने पाही ॥ १ ॥

शुद्धभाव देऊनि मज लावीं तव भजनीं ।

प्रपंची त्रासलो यांतुनि काढावे क्षणीं ॥ २ ॥

तवगुणलीळा नित्यनिरंतर ऎकवी श्रवणी ।

हाची वर मजला द्यावा श्रीगुरुमूर्तीनीं ॥ ३ ॥

मोरेश्वरसुत वासुदेव हा करितो तव सेवा ।

स्वामि समर्था देई यांसी भक्तीचा ठेवा ॥ ४ ॥

Translation - भाषांतर

N/A
55GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-17T01:43:52.1147040-04:00

Comments | अभिप्राय