HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|गणपती आरती संग्रह|
गणपतीची आरती अनादिनायक चिंतामणीदेवा। गणपतीची आरती प्रेमगंगाजळे देवा न्हाणिय
गणपतीची आरती - दीनदयाळा गणपति स्वामी द्य...


Ganapati Arati - Prayer to Lord Ganesha गणपतीची आरती - दीनदयाळा गणपति स्वामी

33GOOG
गणपतीची आरती

दीनदयाळा गणपति स्वामी द्यावी मज भेटी।
तव चरणांची सखया मजला आवडी मोठी॥धृ.॥
कवण अपराध म्हणवुनि देवा केला रुसवा।
अहर्निशी मी हृदयी तुझा करितसे धांवा॥दीन.॥१॥
चिंताकूपी पडलों कोण काढील बाहेरी।
धांवें पावें सखया करुणा करुनि उद्धरी॥दीन.॥२॥
ऐसे होते चित्ती तरि का प्रथमचि देवा।
अंगीकार करुनि केला कृपेचा ठेवा॥दीन.॥३॥
आतां करणें त्याग तरिही स्वामी अघटित।
शरण आलों माझा आता चुकवी अनर्थ॥दीन.॥४॥
यादवसुत हा विनवी दोन्ही जोडूनियां कर॥
तव चरणाचा सखया मजला आहे आधार॥दीन.॥५॥
Translation - भाषांतर

N/A
33GOOG
References : N/A



Created by TransLiteral / Courtsey {Khapre.org} on 2008-01-02T23:53:41.2504016Z

Comments | अभिप्राय