HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|कांकडआरती|
विठ्ठलाची कांकडआरती उठा पांडुरंगा आतां दर्शन कांकडआरती श्रीदत्तप्रभूची श्रीगुरुदत्ता कांकड आरती
कांकडआरती रामाची - कांकड -आरती परमात्मया रघु...


कांकडआरती रामाची



9GOOG
कांकडआरती रामाची

कांकड-आरती परमात्मया रघुपती ।

जीवीं जीवा ओंवाळित निजीं निजात्मज्योति ॥ध्रु०॥

त्रिगुण कांकडा द्वैतधृतें तिंबिला ।

उजळली आत्मज्योति तेणें प्रकाश फांकला ॥१॥

काजळी ना दीप अवधें तेज डळमळ ।

अवनी ना अंबर अवधा निगूढ निश्चळ ॥२॥

उदय ना अस्त जेथें बोध प्रातःकाळीं ।

रामी रामदास सहजीं सहज ओंवाळी ॥३॥

Translation - भाषांतर

N/A
9GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-11T02:16:03.0646064-04:00

Comments | अभिप्राय