HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|कांकडआरती|
कांकडआरती रामाची कांकड आरती परमात्मया रघु कांकडआरती श्रीदत्तप्रभूची
कांकडआरती श्रीदत्तप्रभूची - श्रीगुरुदत्ता कांकड आरती ...


कांकडआरती श्रीदत्तप्रभूची

55GOOG
कांकडआरती श्रीदत्तप्रभूची

श्रीगुरुदत्ता कांकड आरती ओवाळित आतां । तुजला ओवाळित आतां ।

भावें ओवाळित आतां । निद्रातीत जागृत असतां न येचि उठवितां ॥ध्रु०॥

माया वस्त्रांतुनि हे चिंधी सांपडली मजला । नरतनु सांपउली मजला ।

अवचित सांपडली मजला । वाया न जाऊं द्यावी म्हणुनी काकडा केला ॥१॥

विद्या अविद्या द्वैत उठतां त्रिपुटी उद्‌भवली । मायिक त्रिपुटी उद्‌भवली ।

सद्वस्तूचें स्मरणहि नसतां पीळ पडुनि गेली ॥२॥

मोहरुपें स्नेंहांत बुडवुनि ज्योती लावियली । स्वयंज्योती लावियली ।

परंज्योती लावियली । पाहुनि सद्‌गुरु बाबा राम म्हणे निशा सरली ॥३॥

Translation - भाषांतर

N/A
55GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-11T02:17:37.2199952-04:00

Comments | अभिप्राय