HOME|मराठी मुख्य सूची|पंचांग दिनावली|मार्गशीर्ष मास|मार्गशीर्ष शुद्ध पक्ष|
मार्गशीर्ष शुद्ध पक्ष मार्गशीर्ष शु द्वितीया
मार्गशीर्ष शु. प्रतिपदा


Margashirsha shudha Pratipada

 



55GOOG
मार्गशीर्ष शु. प्रतिपदा

* अनरक व्रत :

एक ऋतुव्रत. हेमंत व शिशिर ऋतूंत हे करतात. मार्ग. शु. प्रतिपदेपासून याचा प्रारंभ होतो. यात केशवपूजा व 'ॐ नमः केशवाय' या मंत्राचा १०८ वेळा जप करतात.

 

* कात्यायनी व्रत

नंदव्रजातील कुमारिकांनी श्रीकृष्ण पती मिळावा, म्हणून मार्गशीर्ष मासात महिनाभर व्रत केले. त्या प्रात:काळी यमुनेत स्नान करीत व कात्यायनीदेवीची वालुकामय मूर्ती बनवून तिची पूजा करीत.

 

* खंडोबा-नवरात्र :

मल्हारी-म्हाळसा नवरात्र किंवा खंडोबा-नवरात्र, हे नवरात्र मार्गशीर्ष शु. प्रतिपदेपासून सुरु होते. महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही प्रदेशांत बहुसंख्य जनतेचे कुलदैवत खंडोबा हे आहे. या खंडोबाच्या नवरात्राची स्थापना देवीच्या शारदीय नवरात्राप्रमाणेच करतात. मार्गशीर्ष शु. षष्ठीस हे नवरात्र संपते. (पाहा - चंपाषष्ठी )

Translation - भाषांतर

N/A
55GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-07-02T22:12:22.0000000Z

Comments | अभिप्राय