HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह|श्री दत्तात्रेयाचे अभंग|
श्री दत्तात्रेयाचे अभंग श्रीदत्तात्रेयाचे अभंग ध्याईं मनीं तूं दत्तगुरु
श्री दत्तात्रेयाचे अभंग - नको नको हा चावट धंदा परदो...


दत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.
Dattatrya is considered by some Hindus, to be god who is an incarnation of the Divine Trinity Brahma, Vishnu and Mahesh.



14GOOG
अभंग

नको नको हा चावट धंदा परदोषेक्षण नरा ॥

फुकाचा कालक्षेप पामरा ॥ध्रु०॥

घडी घडीनें काळ खातसे आयुष्य करुनी त्वरा ॥

येतसे शीघ्र शरीरीं जरा ॥

दया नसे त्या यमराजाला देह चिरी चरचरां ॥

फिरविशी डोळे तैं गरगरां ॥चाल०॥

म्हणुनी पाय गुरुचे धरा ॥

मुखानें दत्त दत्त हें स्मरा ॥

अंतीं मोक्षसुखाला वरा ॥

देह नासुनी होईल मुरदा जाळिती भडभड खरा ॥

मानसीं विचार करीं रे बरा ॥नको०॥१॥

कोण कोठुनी जासी कोठें कोण असे आसरा ॥

विचारीं नित्य मनीं प्रियकरा ॥

रांडापोरें राहतील मागें रडशील गददस्वरा ॥

भोगिती अन्य वित्तदारा ॥चाल०॥

हिताचे बोल मनीं हे धरा ॥

समर्पण दत्तपदीं तनु करा ॥

सुखाचा राजमार्ग हा खरा ॥

जितेपणीं हा ’रंग’ बधुनी घे मूळ सुखाचा झरा ॥

सोडुनी आडवाट ये घरा ॥नको०॥२॥

Translation - भाषांतर

N/A
14GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-11T03:36:24.4974864-04:00

Comments | अभिप्राय