HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बाल गीते|
बालगीत दिवा पाहुनी लक्ष्मी ये बालगीत सांग सांग भोलानाथ पाऊ
बालगीत - शाळा सुटली , पाटी फुटली...


बालगीत लहान मुले अवखळपणे गातात.
Balgeet is always sung by children.


14GOOG
बालगीत

शाळा सुटली, पाटी फुटली
आई, मजला भूक लागली ॥धृ.॥

शाळा सुटता धावत सुटले
ठेच लागुनी मी धडपडले
आई मजला नंतर कळले
नवीन कोरी पाटी फुटली ॥१॥

धम्मक लाडू चापट पोळी
नको देऊ मज हवीच गोळी
किंवा दे ग, खमंग चकली
दे ना लवकर, भूक लागली ॥२॥

सायंकाळी जाउ दे मला
पटांगणावरि खेळायाला
तिथे सोबती वाट पाहती
दे ना खाऊ, भूक लागली ॥३॥

गीतकार : योगेश्वर अभ्यंकर
संगीतकार : श्रीनिवास खळे
गायक : कुंदा बोकील (भागवत)

Translation - भाषांतर

N/A
14GOOG
References : N/A



Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-10-14T05:26:28.3473808Z

Comments | अभिप्राय