HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बाल गीते|
बालगीत कृष्णा घालीतो लोळण यश बालगीत एका माकडाने काढलय दुका
बालगीत - सोमवारचा असतो गणिताचा ...


बालगीत लहान मुले अवखळपणे गातात.
Balgeet is always sung by children



9GOOG
बालगीत

सोमवारचा असतो गणिताचा तास
गणिताच्या तासाला मी नापास
गणित विषय माझ्या नावडीचा
रविवार माझ्या आवडीचा ॥१॥

भलताच कठीण तो मंगळवार
डोक्यावर असतो भूगोलाचा भार
भूगोल विषय माझ्या नावडीचा
रविवार माझ्या आवडीचा ॥२॥

घेऊन तोफ़ा आणि तलवारी
इतिहास येतो बुधवारी
इतिहास माझ्या नावडीचा
रविवार माझ्या आवडीचा ॥३॥

Translation - भाषांतर

N/A
9GOOG
References : N/A

Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-01-12T03:13:45.5540208Z

Comments | अभिप्राय