HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बाल गीते|
बालगीत सोमवारचा असतो गणिताचा बालगीत रोज रोज संध्याकाळी  पिं
बालगीत - एका माकडाने काढलय दुका...


बालगीत लहान मुले अवखळपणे गातात.
Balgeet is always sung by children



55GOOG
बालगीत

एका माकडाने काढलय दुकाऽऽऽन
एका माकडाने काढलय दुकाऽऽऽन
आली गिर्‍हाईके छान छान
आली गिर्‍हाईके छान छान छान छान
एका माकडाने काढलय दुकाऽऽऽन

मनी ने आणले पैसे नवे
म्हणाली शेटजी उंदीर हवे
मनी ने आणले पैसे नवे
म्हणाली शेटजी उंदीर हवे
छान छान छान
एका माकडाने काढलय दुकाऽऽऽन

अस्वल आले नाचवीत पाय
म्हणाले मधाचा भाव काय
अस्वल आले नाचवीत पाय
म्हणाले मधाचा भाव काय
छान छान छान
एका माकडाने काढलय दुकाऽऽऽन

कोल्ह्याने मागीतला गुळाचा रवा
आणि म्हणाला मांडून ठेवा
माकड म्हणाले लावुन गंध
आता झालय दुकान बंद
छान छान छान
एका माकडाने काढलय दुकाऽऽऽन

Translation - भाषांतर

N/A
55GOOG
References : N/A

Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-01-11T01:37:29.4617392Z

Comments | अभिप्राय