HOME|mr|sahitya|balsahitya|balgeete|
बालगीत एका माकडाने काढलय दुका बालगीत बाभळीच्या झाडाखाली गाण्या
बालगीत - रोज रोज संध्याकाळी पिं...


बालगीत लहान मुले अवखळपणे गातात.
Balgeet is always sung by children



18GOOG
कावळ्यांची शाळा

रोज रोज संध्याकाळी

पिंपळाच्या झाडावर

कावळ्यांची भरे शाळा

नाही शाळेला छप्पर

शाळेला नाही भिंती

घंटेचा आवाज नाही

गुरुजी आहेत कोण

त्याचा कोणा पत्ता नाही

कोणी कोठे ही बसतो

नेमलेली जागा नाही

ये जा करतात कोणी

त्याना मुळी शिस्त नाही

अभ्यास म्हणजे फक्त

काव काव घोकंपट्‌टी

एवढेच घोकावया

आहे सगळ्यांची गट्टी

काळोखाला घाबरुन

म्हणतात घरी जाऊ

उद्या पुन्हा याच वेळी

काव काव काव करु !

Translation - भाषांतर

N/A
18GOOG
References :

कवी - मा. गो. काटकर


Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-11T03:05:21.1061808Z

Comments | अभिप्राय