HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बाल गीते|
बालगीत रोज रोज संध्याकाळी  पिं बालगीत इंजिनदादा इंजिनदादा
बालगीत - बाभळीच्या झाडाखाली गाण्या...


बालगीत लहान मुले अवखळपणे गातात.
Balgeet is always sung by children



9GOOG
गाण्याची मैफल

बाभळीच्या झाडाखाली गाण्याची मैफल

बाजाची पेटी घेऊन बसले अस्वल

कोल्ह्याने तबल्यावर मस्त थाप दिली

’वा !’ म्हणून सशाने मान डोलाविली

दाढीला हात लावून वानर म्हणाला

’गाढवबुवा, गोड गाणे ऐकवा आम्हाला !’

गाढवबुवा रुबाबात ठाकठीक बसला

खाकरुन थोडे त्याने घसा साफ केला

गाढवबुवाने घेतली एक लांब तान

भसाडया त्या आवाजाने हादरले रान

घाबरलेला वाघोबा टुणकन् उडाला

मैफलीच्या मध्यभागी धपकन् पडला

भ्यालेल्या मैफलीचे वाजले हो बारा

Translation - भाषांतर

N/A
9GOOG
References :

कवी - मा. गो. काटकर


Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-11T03:08:20.5542144Z

Comments | अभिप्राय