HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बाल गीते|
बालगीत बाभळीच्या झाडाखाली गाण्या बालगीत रस्ते साफ घरे साफ  सग
बालगीत - इंजिनदादा , इंजिनदादा , ...


बालगीत लहान मुले अवखळपणे गातात.
Balgeet is always sung by children



21GOOG
इंजिनदादा, इंजिनदादा

इंजिनदादा, इंजिनदादा,

काय करता ?

डबे मी जोडतो, तुम्हांला नेतो,

गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,

काय करता ?

पाणी मी पितो, वाफ मी सोडतो,

गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,

काय करता ?

कोळसा मी खातो, धूर मी सोडतो,

गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,

काय करता ?

हिरवे निशाण बघतो,

चालायला लागतो,

गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,

काय करता ?

शिटी मी फुंकतो, गर्दी हटवतो

गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,

काय करता ?

लाल निशाण बघतो, उभा मी राहतो,

गावाला जातो नव्या नव्या

Translation - भाषांतर

N/A
21GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-11T03:09:32.8681968Z

Comments | अभिप्राय