HOME|
मराठी मुख्य सूची|
मराठी साहित्य|
बालसाहित्य|
बाल गीते|
बालगीत - या चिमण्यांनो , या ग या ...
बालगीत लहान मुले अवखळपणे गातात.
Balgeet is always sung by children
या चिमण्यांनो
या चिमण्यांनो, या ग या
अंगणी माझ्या नाचा या ।
टपटप पाऊल वाजू दे
झपझप पाऊल चालू दे ।
ही घ्या टाळी लाजविते
हे घ्या गाणे मी म्हणते ।
एकामागून एक फिरा
हळूच वळवा मान जरा ।
चटकन् उचला तांदूळ
गरकन् फिरवा पाऊल ।
नाच कुणी पाहिल अपुला
लपा उडा जा दूर पळा ।
Translation - भाषांतर
N/A
References : N/A
Created by
TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on
2007-12-11T03:13:39.6129984Z
Comments | अभिप्राय