राम भजावा राम भजावा राम ॥धृ॥
मंगलदायक नाम प्रभुचे देत असे निजधाम ॥१॥
भवभय भीती उरत नसे ती पार करी श्रीराम ॥२॥
ध्यायी विनायक प्रेमानंदे बलवंत तोची राम ॥३॥