देरे हरी संतपदाची जोड , देरे हरी साधुपदाची जोड ॥धृ॥
संतसमागम आत्मसुखाचा उगवेल सुंदर मोड ॥१॥
सुफळीत करुनी पूर्ण मनोरथ पुरवी जीवीचे कोड फोड ॥२॥
अमृत म्हणेरे संत सज्जनी शेवट करतील गोड ॥३॥