विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ॥धृ॥
ऐकाजी तुम्ही भक्त भागवत । कराल ते हित सत्य करा ॥१॥
कोणाचा जिवाचा न घडे मत्सर वर्ग सर्वेश्वर पूजवावे ॥२॥
तुका म्हणॆ एक देहाचे अवयव । सुख दु:ख सर्व भोग पावे ॥३॥