जयाचिये दारी सोन्याचा पिंपळ । अंगी ऐसे बळ रेडा बोले ॥धृ॥
करील ते काय नोहे महाराज । परी पाये बीज शुद्ध अंगी ॥१॥
जयाने घातली मुक्तीची गवाळी । मिळवीली मादी वैष्णवाची ॥२॥
तुका म्हणे तेथे सुखा उणे काय सुखा काय उणे । राही समाधाने चीत्तीचीया ॥३॥