सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवुनीया । तुळसीहार गळा कासे पिंताबर आवडे निरंतर हेची ध्यान, मकर कुंडले तळपती श्रावणी, कंठी कौस्तुभमणी विराजीतो । तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने ॥