एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम । आणिकाचे काम नाही तेथे ।
मोडूनीया वाटा सूक्ष्म दस्तर केली राज्यभार चाले ऎसा ॥१॥
लावोनी मृदंग श्रुति टाळ घोष । सर्व ब्रह्मरस आवडीने ॥२॥
तुका म्हणे महापातकी पतीत होती जीवनमुक्त हेळामात्रे ॥