धन्य आज दिन संत दर्शनाचा । अनंत जन्मीचा शीण गेला ।
मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे । कदा न सोडावे चरण त्यांचे ॥१॥
त्रिविध तापाची झाली बोळवण देखिले चरण वैष्णवांचे ॥२॥
एका जनार्दनी घडो त्यांचा संग न व्हावा वियोग कदाकाळी ॥३॥