कृपाळू सज्जना तुम्ही संत जन एवढे कृपादान तुमचे मज ।
आठवण तुम्ही द्यावी पांडुरंग । कवि माझा सांगा काकुळती ॥१॥
अनाथ अपरधी पतित आगळा । परि पायावेगळा नका करु ॥२॥
तुका म्हणे तुम्ही निरविल्यापरी मग मज हरी उपेक्षीण ॥३॥