काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याति । वेद महिषामुखी बोलविले ॥धृ॥
कोठवरी वाणू त्याची स्वरुपकीर्ति । चालविली भींति मृतिकेचे ॥१॥
अविद्या मायाचा लावोनी निवारा । ऎसे जगजोद्धारे बोलाविले ॥२॥
नामा म्हणे नित्य तारिले पतित । भक्तीचे हे सारे ज्ञानदेव ॥३॥