दसरा दिवाळी तोची आम्हा सण सखे संतजन भेटतील ।
अमाप जोडिल्या सुखाचीया राशी पार या भाग्यसी नाही आता ॥१॥
धन्य आज दिन आला सोनियाचा पिकलिया वाचा रामनामे ॥२॥
तुका म्हणे कैसे होऊ उतराई जीव ठेवी पायी संताचिया ॥३॥