इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची ।
ज्ञानियाचा राजा भोगतो जाणीव नाचती वैष्णव मागे पुढे मागे पुढे ॥१॥
मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड अंगणात झाड कैवल्याचे ॥२॥
विठ्ठलाऽऽऽ मायबापऽऽऽ उजेडी राहिले उजेड होऊनी निवृत्ति सोपान मुक्ताबाई ॥३॥