पतित पावन म्हणवीसी आधी मग का उपाधी भक्तालागी ॥धृ॥
पतित पावन म्हणवीसी आधी तुझे म्हणविता दुजे अंग संग ।
उणेपणा सांगे कोणाकडे ॥१॥
सिंहाचे भातके जंबुके पै नेता थोरांचिया माथा लाज वाटे ।
म्हणोनी कान्होपात्रा देह समर्पण करावा जतन ब्रिदासाठी ॥२॥