देवा माझे मन लागो तुझ्या चरणी संसारी व्यसनी पाडो नाही ॥धृ॥
नाम स्मरण घडो संत समागम का उगाची भ्रम नको देवा ॥१॥
पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम हाची माझा नेम सिध्दी नेई ॥२॥
आणिक मागणे काही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ होई ॥३॥