खांद्यावरी घोंगडी हातामध्ये काठी । चारीतसे धेनु सावळा जगजेठी ।
राधे राधे मुकुंद मुरारी वाजवितो वेणू कान्हा श्रीहरि ॥१॥
एक एक गौळण एक एक गोपाळ हात धरोनी खेळे रासमंडळ ।
एका जनार्दनी दासमंडळ रचिले । जिकडे पहावे तिकडे अवघे ब्रह्माची कोदंले ॥२॥