नंदाघरी नंदनवन फुलले । बोल बोबडे श्रीरंगाचे गोकुळात घुमले ॥
रिंगण घाली श्याम सावळा बालकृष्ण तो रांगत आला हात धरुनी चालू लागला पुढे पुढे ग पाऊल पडले ॥१॥
हात चिमुकला उंच नाचवी घुमघुम वाळा मधुर वाजवी स्वत:हासूनी जगास कौतुक करते गोकुळ सगळे ॥२॥