चल नाच नाच रे नंदकिशोरा सुर मुरलीचा घूमव जरा ॥१॥
रुमझुम रुमझुम पैंजण वाजाती तालावरती गोपी नाचती सुर स्वर्गातुनी कौतुक पाहती आनंदाचा दिवस खरा ॥२॥
बाल लहरींचा नाच थांबला अवखळ वायूमध्ये थबकला कोकीळ गाई ग गगनाला काय जादु मुरलीधरा ॥३॥