राम गावा राम घ्यावा राम जिवीचा बिसावा ॥धृ॥
कल्याणाचे कल्याण रघुपतीचे गूणगान ॥१॥
मंगलाचे मंगल, कौसल्येचा रामबाळ ॥२॥
राम कैवल्याचा दानी, रामदास अभिमानी ॥३॥