खांद्यावरी घोंगडी हातामध्ये काठी । चारितसे धेनू सावळा जग जेठी ॥
राधे राधे राधें मूकूंद मुरारी वाजवितो वेणू सावळा गिरधारी ॥धृ॥१॥
एक एक गवळण एक एक गोपाळ हाती धरूनी खेळती रास मंडळ ॥२॥
एक जनार्दनी रास मंडळ रचिले । जिकडे पाहावे तिकडे ब्रह्मची कोंदळे ॥३॥