संत कृपा झाली इमारत फळा आली । ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया ।
नामा तयाच्या किंकर, त्याने केला हा विस्तार । जनार्दन, एकनाथ, खांब दिधला भागवत ।
तुका झालासे कळस, भजन करा सावकाश ॥