नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे । माथा शेंदुर वरिवरी दुर्वाकुरांचे तुरे ॥
माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखोनी चिंता हरे । गोसावी वासुदेव कविरे त्या मोराया स्मरे ।
जय जय रघुवीर समर्थ ॥