रुप पाहती लोचनी सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा ।
बहुत सुकृताची जोडी, म्हणूनी विठ्ठल आवडी, सर्व सुखाचे आगर बाप रुखमादेवीवर ॥