सदा माझे डोळे जडो तुझे मुर्ती । रखुमाईच्या पती सोयरीया ।गोड तुझे रुप गोड तुझे नाम । देई मज प्रेम सर्व काळ । विठोमाऊलीये हा चि वर देई । संचरोनि राही हृदयामाजी । तुका म्हणे काही न मागे आणिक । तुझे पायी सुख सर्व आहे । सदा माझे डोळा जडो तुझी मुर्ती ॥