नेत्री अश्रुधारा उभा भीमातिरी लक्ष चरणावरी ठेवोनिया ।
का गा मोकळिके नयेसी का देवा काय मी केशवा चुकलो रे ॥धृ॥
नेणे करु भक्ति नेणे करु सेवा नयेसी का देवा कळले मज ॥१॥
चोखा म्हणे माझ्या जिवीचा विसावा पुकारी तो देवा म्हणोनिया ॥२॥