हेची थोर भक्ती आवडते देवा । संकल्पावी माया संसाराची ॥१॥
ठेविले अनंते तैसेची रहावे । चित्ती असु द्यावे समाधान ॥२॥
वाहिल्या उद्वेग दु:खाची केवळ । भोगणे ते फळ संचिताचे ॥३॥
तुका म्हणे घालु तयावरी भार। वाहु हा संसार देवापायी ॥४॥