एका देवासाठी जगाचे सोसावे । चित्ती असू द्यावे समाधान ॥धृ॥
बरे म्हणे कोणी अथवा वाईट । कर किरे पाठ जगाकडे ॥२॥
बरे म्हणोनिया तुज काय देती । उपाधि लाविती पाठीमागे ॥३॥
तुका म्हणे आता घेई एक नाम । अंतरीचे श्रम विसराया ॥४॥