ज्ञानियाचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे ॥१॥
मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी ॥२॥
ब्रह्मादीक जेथे तुम्हा ओळंगणे इतर तुळणे काय पुढे ॥३॥
तुका म्हणे नेणो युक्तीचीया खोली, ठेविली पायी डोई ,
म्हणूनी ठेविली पायी डोई ॥४॥