पाहिला परळीचा मी सदगुरु पाहिला परळीचा ॥धृ॥
सज्जन गडावरी । नित्य वास करी गुरु आहे हा राष्ट्राचा ॥१॥
घाटी भगवी तेजा लाजवी । उदय झाला जणु भानुचा ॥२॥
माळी अवाळु हृदय कनवाळु । सागर आहे हा दयेचा ॥३॥
ज्ञान देऊनी अज्ञान निरसी दास आहे हा रामाचा ॥४॥