देवा माझे मन लागो तुझे चरणी , संसार व्यसनी न पडो देही ॥धृ॥
नाम संकीर्तन संत समागम , चीऊगावा भ्रम नको देवा ॥१॥
पायी तिर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी नेई ॥२॥
आणिक मागणे नाही नाही देवा , एका जनार्दनी सेवा नित्य घेई ॥३॥