सदानाम घोष करु हरी कथा, लेणे माझ्या चित्ता समाधान ॥धृ॥
सर्व सुखाल्यालो अलंकार, आनंद निर्भय डुलतसे ॥१॥
असो ऐसा कोठे आठवच नाही, देहीच विदेही भोगू दशा ॥२॥
तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूप, लागो नाही अंगा पाप पुण्या ॥३॥